म्हालसवडे / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील चाफोडी, बेरकळवाडी व दोनवडी अशा तीन गावांची एकत्रित ग्रुप ग्रामपंचायत आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा सर्जेराव काशीद यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतच्या सभागृहात पार पडलेल्या निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी उल्हास कांबळे हे होते.
चाफोडी येथे ठरलेल्या रोटेशन नुसार पंढरीनाथ भोपळे यांना पहिल्यांदा सरपंच होण्याचा बहुमान मिळाला होता. त्या नंतर संध्या काशीद व साताप्पा सुर्वे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. सध्या साताप्पा सुर्वे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. रिक्त झालेल्या सरपंच पदावर सुरेखा काशीद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी बळवंत पाटील, नाना पाटील, तानाजी काशीद, उत्तम खोंद्रे, सर्जेराव पाटील, महादेव टिंगे, तलाठी गणेश गवळी, ग्रामसेवक शिवाजी वाडकर, पोलीस पाटील भगवान पाटील, संभाजी सुर्वे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.