कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालवर अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने देवस्थान जमीन धारक शेतक-यांचे धरणे आंदोलनास माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास २५ हजार एकर पेक्षा जास्त देवस्थान जमीनी आहेत. वर्षानुवर्षे या जमिनीतून हजारो कुटूंबांचा उदरनिर्वाह चालतो. सरकारने चुकीचे कायदे करून सदरची जमीन हडप करण्याचा डाव आहे. सदर जमीनी करणारे सर्व शेतकरी आहेत या शेतक-यांची सातबारा पत्रकावरून नोंदी कमी करण्यात आल्या आहेत. या शेतक-यांना सोसायटी , राष्ट्रीयकृत बॅंका यांच्या माध्यमातून देण्यात येणारे कर्जवाटप बंद करण्यात आले आहे. यामुळे या सामान्य शेतक-यांना न्याय मिळण्यासाठी या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला.