शिवाजी विद्यापीठात ‘योगशास्त्र व मुद्रा’ विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन केंद्रातर्फे एम. ए. योगशास्त्राचे विद्यार्थी आणि योग शिक्षकांसाठी दोनदिवसीय ‘योग व मुद्रा’ कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.विद्यापीठाच्या निलांबरी सभागृहात १८ व १९ मार्च रोजी पीएम-उषा कॅपॅसिटी बिल्डींग ऑफ पीजी स्टुडंट्स या योजनेअंतर्गत कार्यशाळा झाली.

 

 

मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचे उद्टन झाले. जगभरातील लोक भारतीय योग शिक्षकांकडून योगशिक्षण घेण्यास उत्सुक आहे. आपण त्यासाठी सिद्ध झाले पाहिजे. त्या दृष्टीने अशा कार्यशाळांचे महत्त्व मोठे आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे प्रमुख उपस्थित होते. आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले. क्षितिजा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यशाळेत डॉ. एस. डी. भालेकर (योगतज्ज्ञ, कैवल्यधाम) यांनी हठयोगातील मुद्रांचे महत्त्व व आधुनिक जीवनशैलीशी संबंधित विकारांवर योग चिकित्सेचा प्रभाव याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विजय शेटे यांनी चक्र ध्यान व्याख्यान आणि प्रात्यक्षिक सादर केले. पंचकोश, चक्रांची महत्ता आणि त्यांचे जागरण याबद्दल मार्गदर्शन केले. दीप्ती काळे (पुणे विद्यापीठ) यांनी मुद्रा, ध्यान, मंत्रयोग यावर मार्गदर्शन केले.

समन्वयक म्हणून कानिफनाथ पंढरे यांनी काम पाहिले. कार्यशाळेला वाय. एस. बोकील, प्रीती चव्हाण, वीणा मालडीकर, उदय घाटे, रवींद्र खैरे उपस्थित होते. विद्यार्थी व योगप्रेमींनी मोठ्या संख्येने कार्यशाळेत सहभाग घेतला.

🤙 9921334545