कोल्हापूर : आमदार राहुल आवाडे यांनी शिरढोण येथे कृष्णा योजनेतील नवीन पाईपलाईन बदलाच्या कामाची पाहणी केली.
इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेतील नवीन पाईपलाईन बदलाचे काम सध्या शिरढोण येथे सुरू आहे. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आ. राहुल आवाडे यांनी भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

या योजनेमुळे इचलकरंजी शहरातील नागरिकांना अधिक नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळणार आहे.
यावेळी अरुण ऐनापुरे, विजय पाटील, मौला बागवान, अविनाश कोळी, अवधूत पोवार, राहुल बिरजे, नितेश शिरूटे, अभी खिलारी, बंडु जाधव, वाशिम शेख यांसह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
