कुंभोज (विनोद शिंगे)
कोलोली पैकी शेलारवाडी (ता.पन्हाळा) येथील कराळे टेक रस्त्यावर नाळव्याच्या ओढ्यावर साकव बांधण्यासाठी आमदार डॉ.विनय कोरे यांच्या फंडातून ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व ग्रामस्थांच्या शुभहस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी विकास पाटील,कोलोली गावच्या सरपंच पवित्रा कांबळे,उपसरपंच प्रकाश पाटील,प्रा.बी.के.जाधव,माजी सरपंच सर्जेराव जाधव,माजी सरपंच राजाराम परीट,दत्त आसुर्लेचे माजी संचालक आर.पी.पाटील,नारायण शेलार गुरुजी,चेअरमन सरदार पाटील,शिवाजी पाटील,पी.डी.हाकारे,सागर जाधव,तानाजी ढवळे,अंकुश पाटील यांच्यासह गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी,सर्व ग्रामपंचायत सदस्य व जनसुराज्य शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज
