कुंभोज (विनोद शिंगे)
छ. संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त छ. शंभुराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने पट्टणकोडोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक – गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) यांनी भेट दिली. तसेच छ. संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास छावा, छ . संभाजी महाराज,राजा शिवछत्रपतीचे पुस्तक किंवा संभाजी महाराजांची मूर्ती भेट म्हणून देण्याचा एक नवा संकल्प राबवल्या बद्दल प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत कौतुक केले तसेच रक्तदान केलेल्या रक्तदात्यास मा.आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र पुस्तक किंवा महाराजाची मूर्ती देण्यात आली.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख शिवानंद पणदे, प्रकाश जाधव, शंकर कामान्ना, महेश नाझरे, किसन तिरपणकर, रावसाहेब शेळके, अनिल दुर्गे, शैलेश भालबर, पोपट कांबळे,महादेव इंगळे, सुमित पोवार, संतोष परिट तसेच इतर उपस्थित मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
