आ. राहुल आवाडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे इचलकरंजीतल्या महानगरपालिकेतील युवा प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ !

कोल्हापूर – आमदार राहुल आवाडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे इचलकरंजी महानगरपालिकेतील युवा प्रशिक्षणार्थींना 6 महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याने सर्व प्रशिक्षणार्थी आनंदित झाले. आमदार राहुल आवाडे यांच्या सहकार्याबद्दल आणि सततच्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या संधीबद्दल प्रशिक्षणार्थींनी आमदार राहुल आवाडे यांचा सत्कार करून मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

 

 

ही मुदतवाढ युवा प्रशिक्षणार्थींना अधिक अनुभव घेण्यासाठी आणि आपल्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या आमदार राहुल आवाडे यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

यावेळी सचिन माछरे, निकिता राहुल साठे, कुसुम शामराव कांबळे, योगिता नानासो गुजरे, संजना स्वप्निल फुटाणे, स्नेहा युवराज मिनेकर, लक्ष्मी योगेश गवरे, अनघा चौगोंडा चौगुले, वर्षा सोमनाथ साळुंखे, शामल स्वप्निल घाडगे, श्वेता कुबेर जाधव, हिमगौरी अरविंद जाधव, संदेश सचिन कांबळे, साकीब बाबाजान जमादार,वरून बाबासाहेब ढोबळे, रोहित संजय लाखे, सौरभ श्रीकांत उरणे, आकाश शांतीनाथ जगताप, किशोरी कृष्णात पाटील, तेजस्विनी शिवाजी जगताप, योगेश मोहन माळी उपस्थित होते.