शिवस्पंदन क्रीडा महोत्सव: क्रिकेटचा अंतिम सामना एमबीए आणि रसायनशास्त्र यांच्यात रंगणार

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात आज क्रिकेटच्या मैदानात अनेक चुरशीचे सामने झाले. यामध्ये पुरूष गटात एमबीए अधिविभाग आणि रसायनशास्त्र अधिविभाग यांच्यात उद्या अंतिम सामना रंगणार आहे.

 

 

 

 पुरूषांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये एम.बी.ए. अधिविभागाने क्रीडा अधिविभागाचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला, तर रसायनशास्त्र विभागाने यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. उद्या या दोन संघात अंतिम सामना आणि क्रीडा अधिविभाग आणि वाय.सी.एस.आर.डी. यांच्यात तिसऱ्या क्रमांकासाठी लढत होईल.

महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत गणित अधिविभाग, अर्थशास्त्र अधिविभाग, नॅनो सायन्स अधिविभाग, तंत्रज्ञान अधिविभाग, प्राणिशास्त्र अधिविभाग यांनी पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

आज सकाळच्या सत्रात झालेल्या विविध अॅथलेटिक्स स्पर्धांचे निकाल अनुक्रमे पुढीलप्रमाणे:

 x १०० रिले (महिला): क्रीडा अधिविभाग, तंत्रज्ञान अधिविभाग आणि भौतिकशास्त्र अधिविभाग.

४०० मीटर (महिला): मनीषा शिंदे (क्रीडा अधिविभाग), अनुष्का भोसले (तंत्रज्ञान अधिविभाग), अनुष्का पाटील (क्रीडा अधिविभाग).

४०० मीटर (पुरुष): प्रेम संकपाळ (तंत्रज्ञान अधिविभाग), पार्थ कांबळे (क्रीडा अधिविभाग), रोहित बिराजदार (जैवतंत्रज्ञान अधिविभाग).

लांब उडी (पुरुष): आर्यन शेजाळ (क्रीडा अधिविभाग), साहिल शिकलगार (रसायनशास्त्र अधिविभाग), शुभम कांबळे (क्रीडा अधिविभाग).

बास्केटबॉल पुरुष स्पर्धेत अर्थशास्त्र आणि क्रीडा अधिविभाग यांनी पुढील फेरीत प्रवेश केला आहे. महिला गटात अर्थशास्त्र विभागाने पुढील फेरीत प्रवेश केला.

कबड्डी पुरुष स्पर्धेत क्रीडा अधिविभाग, ए.जी.पी.एम. अधिविभाग, वाय.सी.एस.आर.डी. अधिविभाग आणि इतिहास अधिविभाग उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. महिला गटात क्रीडा अधिविभाग, कॉम्युटर सायन्स, तंत्रज्ञान अधिविभाग, गणित अधिविभाग उपांत्य फेरीसाठी पात्र झाले.

व्हॉलीबॉल पुरुष स्पर्धेत तंत्रज्ञान विभाग, लायब्ररी सायन्स, ए.जी.पी.एम. विभाग, सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभाग हे उपांत्य फेरीसाठी पात्र झाले आहेत.