प्रशांत कोरटकर यांच्यावर ठोस कारवाई ही व्हायलाच पाहिजे ; खा. शाहू महाराज छत्रपती

कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याबद्दल प्रशांत कोरटकर यांना आतापर्यंत अटक करायला पाहिजे होती. राज्य सरकार म्हणत आहे की, कारवाई करणार, पण ते लवकर कारवाई करत नाही, असा आरोप कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी माध्यमांशी बोलताना केला असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.

 

 

 

खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले, ऐकण्यात आले आहे की ते दुसऱ्या राज्यात गेले आहेत. त्यांच्यावर ठोस कारवाई ही व्हायलाच पाहिजे. मुळात सरकारने स्वतः कोरटकर यांच्यावर गुन्हा नोंदविला पाहिजे. जे कायदे आहेत ते पुरेसे आहेत, त्या कायद्याअंतर्गत कारवाई तातडीने करता येते, नवीन कायद्याची गरज नाही, असेही शाहू महाराज यावेळी म्हणाले.

खासदार शाहू छत्रपती पुढे म्हणाले, न्यायालयाने जामीन दिला असेल. तरीसुद्धा 11 तारखेपर्यंत वेळ दिला आहे. 6 मार्चला मुख्यमंत्री येणार आहेत. राज्यभरात निषेध नोंदवून सगळे कंटाळले असतील, पण असे वक्तव्य करणे योग्य नाही. सगळ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. कोणालाही ते वक्तव्य आवडलेले नसल्याचंही त्यांनी सांगितलं.