कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे भरदाव वेगाने जाणाऱ्या MH २५ २ ८०६७ या इनोव्हा चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्याने एका वयोवृद्धचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजता माळभाग हेरले इंडिया वॉशिंग सेंटर येथे घडला आहे. दत्तात्रय शंकर कदम वय वर्ष 75 असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळलेली माहिती अशी की इनोव्हा ही चारचाकी गाडी सांगलीकडून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना दत्तात्रय कदम हे आपल्या घरी रस्ता ओलांडून जात असताना समोरून येणाऱ्या इनोव्हा गाडीने धडक दिल्याने दत्तात्रय शंकर कदम यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी हातकणंगले पोलीस पाहणी करून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दत्तात्रय कदम यांच्या अपघाती मृत्यूने हेरले गावात हळहळ व्यक्त होत आहे. सदर अपघाताची नोंद रात्री 8 वाजता हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत.