पंचायत समिती हातकणंगले येथे आ. अशोकराव माने यांची तालुका आढावा बैठक

कुंभोज  (विनोद शिंगे)
पंचायत समिती,हातकणंगले. येथे विभागाचे आमदार डॉ.अशोकराव माने यांनी तालुक्यातील विविध विषयांची आढावा बैठक घेतली.या बैठकी दरम्यान आरोग्य,शिक्षण,महिला व बालकल्याण,ग्रामीण पाणी पुरवठा,पशुसंवर्धन,कृषी, ग्रामपंचायत,15 वा वित्त आयोग,समाजकल्याण, एस.बी.एम,एम.आर.आय.जी.एस, एम.एस.आर.एल.एम, या विभागातील कामांचा आढावा घेऊन संबंधित विभागाच्या अधिकऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

 

 

यावेळी गोरगरीब,कष्टकरी, श्रमिक, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक,यांना केंद्रबिंदू मानून राज्य व केंद्र सरकारने विविध योजना आखल्या आहेत या योजनांचा लाभ माझ्या विधानसभा मतदारसंघातील जनतेला झाला पाहिजे व या मतदारसंघाचा विकास पाहण्यासाठी बाहेरून लोक आले पाहिजेत.आपला मतदारसंघ एक नंबर झाला पाहिजे,असे काम करा कर्तव्यात कसूर चालणार नाही.मिळालेल्या अधिकाराचा योग्य वापर करा आपण सगळे जनतेसाठी आहोत असे गृहीत धरून काम करूया असे मत व्यक्त केले.

हातकणंगले विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा करायचा आहे त्यासाठी राजकारणालीकडे जाऊन काम करावे लागणार आहे आता त्याची फक्त सुरुवात झाली आहे.अजून खूप कमी करायची असून या कामांना निधीची कमतरता भासू देणार नाही असे मत आमदार अशोकराव माने बापू यांनी व्यक्त केले.
हातकणंगले पंचायत समिती स्तरावर आढावा बैठक घेतल्या बद्दल सर्व ग्रामपंचायतींच्या वतीने आमदार डॉ.अशोकराव माने यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
यावेळी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी,वारणा साखर कारखान्याचे संचालक उदय पाटील,सूतगिरणीचे व्हा.चेअरमन अनिल कांबळे, माणगावचे सरपंच राजू मगदूम, आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले,उद्योगपती संदीप कारंडे,भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील,सरपंच दीप्ती माने, संगीता नरदे, शिवाजी पाटील, सुजितसिंह मोहिते, दिलीप पाटील,अभय काश्मिरे, राजेश पाटील,संभाजी मोरे,संभाजी पवार,प्रकाश पाटील,सुशांत वड्ड,राहुल कुंभार,नितीन पाटील,हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच व ग्रामविकास अधिकारी,विस्तार अधिकारी,आरोग्य अधिकारी,बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

🤙 9921334545