सोलरला वीज बिल आकारणी केल्यास रस्त्यावर उतरू – आप चा महावितरणला इशारा

कोल्हापूर : सौरऊर्जा निर्मिती करण्यासाठी केंद्र शासनाने सूर्यघर योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक ग्राहक सोलर पॅनल बसवत आहेत. गेल्या काही वर्षात अनेक ग्राहकांनी सौरऊर्जेचा महत्व ओळखून महावितरणच्या नेट मिटरिंग स्कीम मधून सोलर पॅनल बसवले आहेत. यामधील बहुतांश ग्राहकांनी बँकेचे कर्ज काढले आहे.

 

 

 

परंतु, सौर ऊर्जेचा वापर करून नेट मिटरिंगच्या माध्यमातून अधिकची वीज महावितरणला विक्री केली जात असताना ग्राहकांना रात्रीच्या वीज वापरावर बिल आकरण्याचा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दिला आहे.

हा प्रस्ताव अन्यायकारक असून सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करणारा आहे. कोल्हापुरातील तब्बल आठ हजार ग्राहकांना याचा फटका बसणार असल्याने हा प्रस्ताव मागे घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा आम आदमी पार्टीने दिला. याचे निवेदन महावितरणचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांना देण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, समीर लतीफ, दुष्यंत माने, रवींद्र राऊत आदी उपस्थित होते.

🤙 9921334545