आ. सतेज पाटील यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे नूतन अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सदिच्छा भेट घेतली

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नूतन अध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस मुख्यालय, मुंबई येथे आमदार सतेज पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यांना आई अंबाबाईची मुर्ती देऊन कोल्हापूर जिल्हा काँग्रेसतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर यांच्यासह राहुल बजरंग देसाई, विनायक अप्पी पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, तौफिक मुल्लाणी, एनएसयूआयचे शहराध्यक्ष अक्षय शेळके, उमेश पाडळकर, ओबीसी सेलचे प्रवीण पुजारी, अनुसूचित जाती सेलचे शहर प्रमुख दुर्वास कदम, काँग्रेसचे जिल्हा सचिव संजय पोवार- वाईकर, शशांक बावचकर, सूर्यकांत पाटील- बुद्धीहाळकर, गोकुळचे संचालक आर. के. मोरे, बयाजी शेळके तसेच दिग्विजय कुराडे, विनायक घोरपडे, हिंदुराव चौगले, शामराव देसाई, भगवानराव जाधव, शंकरराव पाटील, विजयानंद पोळ, सरफराज रिकीबदार आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

🤙 9921334545