एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय व तालुकास्तरीय मराठी स्पर्धेमध्ये घवघवीत यश.

कुंभोज(विनोद शिंगे)

शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ जानेवारी ते १० फेब्रुवारी तालुकास्तरीय मराठी स्पर्धेमध्ये घवघवीत यश विद्यार्थ्यांनी संपादित केले. यामध्ये निबंध लेखन प्रथम क्रमांक संस्कृती नळे, इ.८ वी, वक्तृत्व स्पर्धा द्वितीय क्रमांक अन्वी कांबळे, इ.८ वी,कथाकथन स्पर्धा प्रथम क्रमांक संस्कार कोथळे इ.८वी तर कथालेखन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक वृषाली खोंद्रे इ.९वी वरील सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. वरील सर्व स्पर्धा मथुरा हायस्कूल, इचलकरंजी येथे संपन्न झाल्या होत्या.

 

 

जागृत ग्राहक राजा,महाराष्ट्र राज्य ग्राहक संघटना, धनकवडी, पुणे. यांच्यावतीने राज्यस्तरीय मराठी निबंध स्पर्धेमध्ये देखील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.यांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राजक्ता बावचे इ.१०वी ,द्वितीय क्रमांक संघमित्रा कांबळे इ.९ वी, तृतीय क्रमांक प्राची बावचे इ.९ वी तसेच जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक सृष्टी पांडव इ.८ वी यांनी यश संपादन केलेले आहे.
यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे, उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे,पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई, तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई,व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले तसेच मराठी विभाग प्रमुख सुदर्शन चौगुले यांचे सहकार्य लाभले.