आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते दत्तवाड येथे घरकुल मंजुरी पत्र वाटप

कोल्हापूर : ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने पंतप्रधान आवास योजना टप्पा दोन अंतर्गत अनुदान दिले जात आहे.लाभार्थ्यांनी मंजूर घरकुलांचे वेळेत बांधकाम पूर्ण करावे,त्यासाठी शासनाकडून पाच ब्रास वाळूही पुरवली जाईल अशी माहिती दिली.दत्तवाड येथील देशभक्त रत्नाप्पान्ना कुंभार सभागृहात आयोजित घरकुल मंजुरी पत्र वाटप कार्यक्रमात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

 

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकांत कांबळे होते.दत्तवाड, घोसरवाड,जुने दानवाड,नवे दानवाड, टाकळी,हेरवाड,आकिवाट येथील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे प्रदान करण्यात आली.त्याचबरोबर घरकुल बांधकाम संदर्भातील मार्गदर्शन व शंका समाधान करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या ऑनलाईन संवाद कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपगट विकास अधिकारी मुकेश साजगाने यांनी केले. त्यांनी सांगितले की,शिरोळ तालुक्यातील ३५९५ घरकुले मंजूर झाली आहेत.या योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने प्रत्येक लाभार्थ्याला घर मिळावे,यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

यावेळी मल्लाप्पा खोत, विस्ताराधिकारी रवींद्र कांबळे,डॉ. पांडुरंग खटावकर,ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण,डी.एन. सिदनाळे,बी.वाय.शिंदे,राजगोंडा पाटील,प्रमोद पाटील,विवेक चौगुले, सुरेश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य,लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.