मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक २४व्या पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात

कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक २४व्या पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पदवी मिळवली आहे त्या सर्वांचे मनस्वी अभिनंदन केले.

 

 

 

रुग्ण सेवा ईश्वर सेवा आहे आपण आज विद्यापीठाच्या पदवीधरांनी केवळ शैक्षणिक टप्पा पार केला नसून वैद्यकीय क्षेत्रातील एका मोठ्या जबाबदारीची सुरुवात केली आहे. डॉक्टर म्हणून समाजसेवेचे पवित्र कार्य तुम्ही हाती घेत आहात आणि तुमच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करत असताना करुणा, नैतिकता, आणि सेवा भावनेची जाण असणे आवश्यक आहे. तुम्ही एक डॉक्टर म्हणून केवळ उपचार करणारे न राहता समाजासाठी मार्गदर्शक आणि संशोधक बनावे. वैद्यकीय शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपण महाराष्ट्रातील आणि देशातील आरोग्यसेवा क्षेत्राला एक नवीन उंचीवर नेणार याची मला खात्री आहे.असे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

विकसित भारताची जी संकल्पना माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी मांडली आहे, त्यास अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण एकजुटीने सामान्य नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध होऊ या.असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

राज्यपाल आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान वि‌द्यापीठाचे कुलपती, श्री. सी. पी. राधाकृष्णन साहेब, माननीय कुलगुरु, लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर मॅडम, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे अध्यक्ष, डॉ. बी. एन. गंगाधर साहेब, माननीय लोकप्रतिनिधी, प्रतिकुलगुरु डॉक्टर मिलिंद निकुंभ साहेब, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाल परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, वि‌द्यापीठ अधिकारी, अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापकगण, पालक आणि पदवीधर वि‌द्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.