हातकणंगले शहरासाठी नवीन नळ पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा – खा. धैर्यशील माने

हातकणंगले : हातकणंगले ग्रामपंचायतचे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून नगरपंचायत मध्ये रुपांतर करण्यात आले आहे. हातकणंगले शहराची वाढती लोकसंख्या व होणारा विस्तार लक्षात घेता जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडत असून सध्या शहरवासीयांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे हातकलंगले शहरासाठी अंदाजे 60 कोटी रुपयांची नवीन नळ पाणी पुरवठा योज ना मंजूर करण्यासाठीची मागणी केली होती .या मागणीस एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली होती.त्यानुसार नगरपंचायत प्रशासनाकडून तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता .मात्र नेज ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध होत नसल्यामुळे तांत्रिक मान्यता मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या.
यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करून सदर नवीन पाणीपुरवठा योजनेस नेज ग्रामपंचायत हद्दीत जागा देण्याचा प्रस्ताव खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते  नगरपंचायत चे  मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्याकडे देण्यात आला .यामुळे आता लवकरच तांत्रिक मान्यता मिळून प्रशासकीय मान्यता मिळण्याचा मार्ग सुखकर झाला आहे. सदर योजनेचे काम प्रत्यक्षात लवकरच सुरू होईल त्यामुळे हातकलंगले नगरवासीयांकडून या कामाचे कौतुक व खासदार माने यांची अभिनंदन होत आहे.
🤙 8080365706