कुंभोज (विनोद शिंगे)
कुंभोज (ता. हातकणंगले) येथील माजी उपसरपंच अजित देवमोरे यांनी आज खासदार धैयशील माने यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केला यावेळी खासदार धैयशील माने यांनी माजी उपसरपंच अजित देवमोरे यांना गटबंधन बांधून शिंदे गटात जाहीर प्रवेश करून ,शिंदे गट व महाराष्ट्र सरकार च्यामाध्यमातून कुंभोज गावच्या व परिसराच्या विकासासाठी आपण लागेल ते सहकार्य करू असे आश्वासन दिले.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची दखल घेऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असून आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला एकनाथ शिंदे सारख्या नेतृत्वाची गरज आहे. असे गौरव उद्गार माजी सरपंच अजय देवमोरे यांनी काढले.
