आ.अमल महाडिक यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

कोल्हापूर (विनोद शिंगे)
कोल्हापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गांधीनगर फाटा ते शिवाजी पूल हा उड्डाण पूल उभारण्यासंदर्भात आराखडा बनवण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच दिले होते. त्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आ.अमल महाडिक यांनी घेतली.

 

 

या बैठकीत उड्डाणपुलाचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार करावा तर युटिलिटी शिफ्टिंग आणि जागे संदर्भात महानगरपालिकेने जबाबदारी घ्यावी हा निर्णय घेण्यात आला. लवकरात लवकर आराखडा पूर्ण करून मंत्री महोदयांकडे सादर केला जाईल तसेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल अशी ग्वाही याप्रसंगी दिली.