हातकलंगले तालुक्यातील आरोग्यविषयक प्रश्न संदर्भात आ.अशोक मानेंची पालकमंत्र्यांशी चर्चा

कुंभोज ( विनोद शिंगे)
हातकणंगले येथे उपजिल्हा रुग्णालय करणे,भादोले आरोग्य केंद्र, टोप प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच किणी येथील ट्रामा सेन्टर,तिळवणी येथे प्राथमिक उपकेंद्र,ग्रामीण आरोग्य केंद्र पट्टणकोडोली व वडगांव व परिसरातील नागरिकांसाठी अद्यावत आरोग्य केंद्रयांसह तालुक्यातील आरोग्य विषयक विविध अडचणी व समस्या विषयी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री कोल्हापूर चे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ अशोकराव माने तसेच आरोग्य विभागाचे सचिव, उप सचिव,आयुक्त, आरोग्य अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये मा.मंत्रिमहोदयांनी अधिकाऱ्यांना सर्व प्रस्ताव दुरुस्ती सह मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले.

 

 

यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने ,भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिहं पाटील, जवाहर चे संचालक अभय काश्मिरे,सनद भोजकर, किशोर जामदार, स्वीय सहायक सुहास राजमाने उपस्थित होते.