आवाज हे अभिनयाचे प्रभावी माध्यम: प्रभाकर वर्तक

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ, संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे ‘आवाज, अभिनय आणि रंगभूमीच्या वेगळ्या वाटा’ या विषयावर दि. १७ व १८ फेब्रुवारी रोजी एकूण चार सत्रांमध्ये दोन दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर वर्तक, पुणे हे मार्गदर्शक म्हणून लाभले.

 

 

 

 

 

या कार्यशाळेसाठी श्री. वर्तक यांनी आवाज आणि अभिनय  परस्पर संबंध कसा असतो, आवाजनिर्मिती कशी होते, आवाज कसा असावा, आवाजातील गुण-दोष कोणते, आवाजाचं मुल्यमापन कसे करावे याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी भाषेचे गुण-दोष, भावनादर्शकता, प्राणायमाचे प्रकार व त्यांची प्रात्यक्षिके, योग्य उच्चार पद्धती व प्रात्यक्षिके, संवाद कसा समजून घ्यावा, रंगभूमीवर सामाजिक प्रश्नांसाठी वापरल्या गेलेल्या पद्धती – प्लेबॅक थिएटर आणि फोरम थिएटर इ. अनेक विषयांवर आपले सखोल विचार मांडले. या कार्यशाळेमध्ये अधीविभागातील तसेच बाहेरील बहुसंख्य विद्यार्थी  व रंगकर्मींनी सहभाग घेतला.

सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत संगीत व नाट्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विनोद ठाकुरदेसाई यांनी केले. पाहुण्यांची ओळख व आभार डॉ. राजश्री खटावकर यांनी मानले.नाट्य कार्यशाळेचे व्यवस्थापन मल्हार जोशी व अतुल परीट यांनी केले. यावेळी नाट्यशाखेचे डॉ. संजय तोडकर, रवीदर्शन कुलकर्णी, राज पाटील, युवराज केळुसकर,किरणसिंह चव्हाण हे उपस्थित होते.