संजय घोडावत इन्स्टिट्यूट यांची “इनक्युबॅशन हब संस्था” म्हणून निवड 

कोल्हापूर  (विनोद शिंगे)
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, इनक्युबॅशन उपक्रमांतर्गत राज्यातील पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम राबविणाऱ्या मंडळाशी संलग्नित संस्था ‘संजय घोडावत इन्स्टिट्यूट’ यांची
इनक्युबॅशन हब संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. अशी माहिती इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी दिली आहे.

 

 

 

पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम राबविणाऱ्या मंडळाशी संलग्नित संस्था तसेच स्वायत्त संस्था मधून शिकणाऱ्या विद्यार्थी व अध्यापकांमध्ये इन्क्युबॅशन, स्टार्टअप, नव संकल्पित उद्योग जागृती निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या कल्पनेला प्रोत्साहन देऊन तांत्रिक क्षेत्रातील समस्या वर उपाय शोधणे अध्यापक व विद्यार्थी यांना स्टार्टप करिता उपलब्ध असलेल्या परिसंस्थेची ओळख करून देणे इत्यादी उद्दिष्टे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने “भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन इंटरपनलशिप अँड लीडरशिप” पुणे यांच्याशी सामंजस्य करार केलेला आहे. या इनक्युबॅशन हब मुळे ग्रामीण भागातील व संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नव संकल्पित उद्योग निर्मिती करण्याची संकल्पना निर्माण होणार आहे.

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता या विषयी केलेल्या कामाचा परिपूर्ण प्रस्तावासह अहवाल सादर करून ‘इंक्युबॅशन हब संस्था’ मंजूर करण्यासाठी इन्स्टिट्यूटचे कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग प्रमुख प्रा. अजय बी. कोंगे, पदविका अभियांत्रिकी विभाचे सर्व विभाग प्रमुख यांनी परिश्रम घेतले आहेत.

संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन, संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी इनक्यूबॅशन हब इन्स्टिट्यूट निवड झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व स्तरावरून इन्स्टिट्यूटला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.