कुंभोज (विनोद शिंगे)
कुंभोज (ता.हातकणंगले) येथील ओम पब्लिक स्कूलचे कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत शेकडो विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असून ही संस्था स्थापन करणाऱ्या विनायक माने व अश्विनी माने यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत उद्योगपती प्रसन्न देसाई यांनी बोलताना व्यक्त केले. ते कुंभोज येथे ओम पब्लिक स्कूलच्या वतीने आयोजित दहावीतील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार विनोद शिंगे होते.
यावेळी बोलताना प्रसन्न देसाई म्हणाले की विद्यार्थिनी केवळ पुस्तकी ज्ञाना पेक्षा बाहेरील जनरल नॉलेज घेणे गरजेचे आहे. परिणामी प्रत्येक मनुष्यात एक कला लपलेली असते त्या कलेतील महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांनी त्या क्षेत्रातील छत्रपती होणे गरजेचे आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार विनोद शिंगे बोलताना म्हणाले की केवळ पुस्तकी ज्ञान घेता आज विद्यार्थ्यांना सुसंस्कृत व धार्मिक शिक्षण देणे गरजेचे आहे. परिणामी आज पुस्तकाच्या युगात मोबाईल ने मोठे स्थान निर्माण केले असून विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून आवश्यक तेवढेच नॉलेज घ्यावे परिणामी आज घराघरातील नातेसंबंध दूरावत चालले असून मोबाईल मुळे माणसे स्वतःपासून दूर जात आहेत.
आज मुलींना मोफत शिक्षण मिळत आहे. त्याचा मुलींनी फायदा घ्यावा. ओम पब्लिक स्कूलचे इंटरनॅशनल स्कूल करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी विद्यार्थीना केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थापक चेअरमन विनायक माने व अश्विनी माने यांच्यावतीने करण्यात आला. यावेळी निरोप समारंभाचे औचीत साधून विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी संशोधक म्हणून निवड झाल्याबद्दल प्रतिक्षा नकाते तसेच डिजिटल मीडिया हातकणंगले पत्रकार संघाच्या संपर्कप्रमुख पदि निवड झाल्याबद्दल विनोद शिंगे तसेच सचिन भानुसे यांचु हातकणगले पत्रकार संघटनेचे अध्यक्षपदी व राहुल रत्नपारखे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार विनायक माने व प्रसन्न देसाई यांच्या वतीने करण्यात आला.