आ. सतेज पाटील यांच्या हस्ते मौनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन

कोल्हापूर: श्री मौनी विद्यापीठ संचलित, श्री शाहू कुमार भवन बहुउद्देशीय प्रशाला गारगोटी येथील विद्यार्थी- विद्यार्थ्यीनींनी काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन येथील कलादालनात झाले.

 

 

बालचित्रकारांनी त्यांच्या चित्रांतून साकारलेले रंगीबेरंगी भावविश्व पाहून मन आनंदित झाले. कुंचल्यातून साकारलेले निसर्गचित्र, सामाजिक संदेश आणि बालसुलभ कल्पना कौतुकास्पद होत्या. त्यांच्या हातून नवनवीन सुंदर कलाकृती घडोत अशा शुभेच्छा याप्रसंगी व्यक्त केल्या.

यावेळी शिक्षक भारती पुणे विभागाचे अध्यक्ष दादासाहेब लाड, मौनी विद्यापीठ व्यवस्थापनचे सदस्य शैलेंद्र कोळी, दळवीज आर्टचे प्राचार्य अजय दळवी, कलाध्यापक संघाचे प्रशांत जाधव, मुख्याध्यापक डॉ. एस. बी. शिंदे सर, कलाध्यापक डी. डी. मांडे, रंजीत चौगुले यांच्यासह विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होत्या