प्रियंका मडके हिची मंत्रालय महसूल सहाय्यक पदी निवड

कुंभोज (विनोद शिंगे)

खोची तालुका हातकणंगले येथील प्रियांका संजय मडके हीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परिक्षेत महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालय महसूलसहाय्यक(REVENUEASSISTANT)या पदी निवड झाली आहे.

 

 

तिच्या या निवडीमुळे खोची सह परिसरात आनंदाची वातावरण पसरले असून तिचा सत्कार ग्रामपंचायत व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने करण्यात आला. तिच्या या निवडीमुळे खोची सह परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

तिच्या निवडीचे वृत्त गावात समजताच तिच्या कुटुंबीयांनी व गावातील नागरिकांनी फटाक्याची आताशबाजी व गुलालाची उधळण करून आपला आनंद साजरा केला.