विवेकानंद कॉलेजचे राज्यस्तरीय वक्तृत्व, सुगम गायन व चित्रकला स्पर्धेतील यश

कोल्हापूर : स्वामी विवेकानंद हे प्रेरणास्थान असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत नागठाणे येथे शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी व गुरुदेव कार्यकर्त्यांनी खालीलप्रमाणे सुयश मिळविले आहे.

 

 

यामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये 11 वी सायन्स च्या विद्यार्थिनी कु. वेदिका मोरे, हिने प्रथम क्रमांक मिळविला. सुगम गायन स्पर्धेत कु. सृष्टी खोत, 11 वी सायन्स्‍ हिने व्दितीय क्रमांक तर चित्रकला स्पर्धेत कु. सचिंता गुरव हिने तृतीय क्रमांक मिळविला.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर.कुंभार , स्पर्धा समन्वयक प्रा.समीक्षा फराकटे , प्रा सौ. एम.बी.साळुंखे, प्रा. जे.आर.भरमगोंडा, प्रा एन.एन.हिटणीकर , प्रा एम आर नवले, प्रा.गीतांजली साळुंखे , रजिस्ट्रार श्री. आर.बी.जोग यांनी अभिनंदन केले आहे.