गांज्या बाळगणाऱ्याची गोकुळ शिरगाव येथे पोलिसांकडून धिंड

कोल्हापूर –
गोकुळ शिरगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील कणेरी येथील माधवनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील परिसरात रविवार ९ रोजी दत्तात्रय पांडुरंग माने (वय ४४, रा. व्हन्नुर ता.कागल) याच्याकडे गांजा मिळाला. त्याच्यावर गोकुळ शिरगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला. तसेच एमआयडीसी फाटा व माधवनगर चौक या भागातून त्यांची धिंड काढली.

 

 

सहायक पोलिस निरीक्षक तब्बूसुम मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी दुपारी स्प्लेंडर मोटरसायकल वरून गांजा घेऊन जात असलेल्या माने याला पकडून त्याच्याकडून प्लास्टिकचे पिशवीमध्ये असलेला ५८० ग्रॅमचा गांजा पकडला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाले असून पोलीस कॉन्स्टेबल संदेश पवार यांनी फिर्याद दिली. हा गांजा कोठून आणला याची चौकशी सुरू असून कोण अंमली पदार्थांचा साठा, विक्री व सेवन करत असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आव्हान गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या स पो नि तब्बूसुम मगदूम यांनी
नागरिकांना केले आहे.