कोल्हापूर –
कोल्हापूरला फुटबॉलची पंढरी असे समजले जाते कोल्हापुरातील फुटबॉल याला राजश्रय मिळाला. कोल्हापुरातील अनेक फुटबॉल खेळाडू राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचा ठसा उमटवत आहेत. शिवाजी विद्यापीठाचा फुटबॉल संघ हा देखील अखिल भारतीय स्तरावर एक नावाजलेला संघ म्हणून ओळखला जातो. वेस्ट झोन स्पर्धेत शिवाजी विद्यापीठ फुटबॉल संघाने दिमागदार कामगिरी करून. अखिल भारतीय विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र झाला. वेस्ट झोन मध्ये जो संघ खेळला तोच संघ व खेळाडू अखिल भारतीय विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी उतरवा लागतो.
स्पर्धेची तारीख १ महिना अगोदर जाहीर झाली होती . 22 पैकी ६ खेळाडूंनी स्पर्धेस जाण्यास असमर्थता दाखवली. 16 खेळाडूंचा संघ घेऊन जाण्याचे निश्चित करण्यात आले, परंतु या स्पर्धेसाठी फक्त ११ खेळाडू चेच रेल्वेचे तिकीट काढण्यात आले ११तिकिटावर १६ खेळाडू कानपूरला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वतः संघ व्यस्थापक अभिजीत वणीरे संघा सोबत गेले नाहीत. १६ पैकी ५ खेळाडू यांनी रेल्वेतून पळ काढली. स्थानिक फुटबॉल लीगमुळे काही खेळाडू स्पर्धेसाठी गेले नाहीत. फक्त 11 खेळाडूच घेऊन शिवाजी विद्यापीठ संघ कानपूर येथे फुटबॉल मॅचेस खेळला. शिवाजी विद्यापीठाचे फुटबॉल मध्ये कमवलेले नाव धुळीस मिळाले.
यामध्ये क्रीडा संचालक यांनी कानपूर येथे होणाऱ्या फुटबॉल संघास रेल्वेने न पाठवता विमानाने पाठवले असते तर पूर्ण संघ कानपूरला पोहोचला असता. कुंभमेळ्याची संभावित गर्दी पाहता खेळाडूंनी प्रवास पाहता स्पर्धेतून काढता पाया घेतला अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. संघ व्यवस्थापक अभिजीत वणिरे सर स्पर्धेसाठी का गेले नाही याची चौकशी करावी जे खेळाडू स्पर्धा सोडून माघारी आले त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी तसेच इतकी महत्त्वाची स्पर्धा असताना त्यांना सुख सोयी सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या क्रीडा संचालकांच्या कारभाराची चौकशी करावी. शिवाजी विद्यापीठाचे नाव बदनाम करणारे सर्व महाभागांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आंदोलन छेडेल याची दखल घ्यावी.