कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी दिल्ली येथे आयोजित केलेल्या तीन महिन्याच्या शिबिरातील खडतर प्रशिक्षणातून निवड झालेल्या अंडर ऑफिसर समिधा घुगरे, बी. कॉम. भाग 3 तसेच आर्मी दिवस परेड साठी 1 महिना प्रशिक्षण घेऊन निवड झालेली अंडर ऑफिसर निशा बजागे, बी. ए. भाग 3 आणि जम्मू काश्मीर येथे बर्फातील हिवाळी धाडसी खेळ प्रशिक्षण शिबिरात उत्कृष्ट सहभाग घेणाऱ्या अंडर ऑफिसर शरयू सुतार , बी. एस्सी. भाग 3 अशा तीन एन.सी.सी. छात्रांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर आर कुंभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य मा. अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी मा. प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. उर्मिला खोत, डॉ. सनी काळे, रजिस्ट्रार आर.बी.जोग, पालक किरण घुगरें उपस्थित होत्या.
वरील सर्व छात्रांना मेजर सुनिता भोसले, लेफ्टनंट जे. आर. भरमगोंडा, 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन.सी.सी. चे कर्नल संधान मिश्रा यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले