मंत्री मुश्रीफांच्या हस्ते खडकेवाडच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा

कोल्हापूर : खडकेवाडा (ता. कागल) येथे मंत्री हसन मुश्रीफ यांची कागल गडहिंग्लज उत्तुर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी सलग सहाव्यांदा निवड झाल्याबद्दल व महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार समारंभ तसेच ग्रामपंचायत खडकेवाडच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा व विविध विकास कामांचा शुभारंभ पार पडला.

 

 

यावेळी मुश्रीफ यांनी खडकेवाडा – बेळंकी ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीत 603 मताचे मताधिक्य दिल्याबद्दल आभार मानले. येत्या दोन वर्षात राहिलेली विकास कामे पूर्ण करून देण्याचे आश्वासनही दिले.

यावेळी बिद्री कारखान्याचे संचालक आर व्ही पाटील, पैलवान रवींद्र पाटील, फत्तेसिंह भोसले – पाटील, माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकासराव पाटील, कागल तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक डी पी पाटील, काका पाटील, लिंगनूरचे माजी सरपंच मयूर आवळेकर, सदाशिव दुकान, लिंगनूरचे सरपंच स्वप्निल कांबळे, नाना देसाई, माजी सरपंच अल्लाबक्ष सय्यद (सर), अरविंद किल्लेदार, हनमंत माने, खडकेवाडच्या सरपंच सुवर्णा जाधव, उपसरपंच सुशीला कुराडे, रमेश कदम, भाऊसो पाटील, हर्षवर्धन घोरपडे, रामदास किल्लेदार, पुंडलिक कुदळे, अशोक कदम, अशोक पाटील, सुशांत खोत, रघुनाथ घोरपडे, सुनील कदम, प्रताप पाटील, युवराज जाधव, संदीप खोत, नियाज देसाई, राजू मकानदार, रामचंद्र सातवेकर, यांच्यासह ग्रामस्थ, बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.