आघाडीच्या कलाकारांच्या उपस्थितीने जयसिंगपुरातील राजर्षी शाहू महोत्सवाने उपस्थित हजारोंची मने जिंकली

कोल्हापूर : बहारदार नृत्य,मंत्रमुग्ध करणाऱ्या गाणी, रसिक प्रेक्षकांचा सळसळता उत्साह आणि मराठी चित्रपट मालिका मधील आघाडीच्या कलाकारांच्या उपस्थितीने जयसिंगपुरातील राजर्षी शाहू महोत्सवाने उपस्थित हजारोंची मने जिंकली.आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशी,रिंकू राजगुरू यांच्यासह ऋषिकेश शेलार,शिवानी रांगोळे,धनंजय पवार,गायिका राधा खुडे यांचा राजर्षी शाहू पुरस्काराने गौरव करण्यात आला.

 

 

राजर्षी शाहू महोत्सवात आघाडीच्या कलाकारांना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते हस्ते व उद्योगपती विनोद घोडावत यांच्या हस्ते राजर्षी शाहू पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी शाहू महोत्सव समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष संजय पाटील(यड्रावकर),उपाध्यक्ष माजी नगसेवक राहुल बंडगर,कार्याध्यक्ष माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे,माजी नगरसेवक संभाजी मोरे,बजरंग खामकर,पराग पाटील यांच्यासह माजी नगरसेवक,अधिकारी कर्मचारी रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.