कोल्हापूर : कुरुंदवाड येथील जैन संस्कृतीक भवन येथे शिरोळ तालुका पूरग्रस्त सेवा संस्थेतर्फे आयोजित संघर्ष मेळाव्यात आ. राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहिले.अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे जेष्ठविधी तज्ञ अँड सुरेश माने होते.आम.अशोकराव माने, निवृत्त जल अभियंता प्रभाकर केंगारे,रणजीतसिंह माने-पाटील,डॉ.एस के माने,राष्ट्रवादीच्या सुमनताई चव्हाण,संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड,डॉ.दगडू माने,राष्ट्रीय मातंग गारुडी समाजाचे नेते अनिल लोंढे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आ. यड्रावकर म्हणाले, पुरग्रस्तांच्यासाठी 3 हजार,200 घरकुल मंजूर झाले आहेत.अनुसूचित जाती,इतर मागास प्रवर्गातून आवास योजना करून देण्यासाठी प्रयत्न करू,पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकार नवीन परिपत्रक जाहीर करणार आहे.तो लवकरच लागू होईल आणि प्रदूषणाचा प्रश्न निकाली निघेल असे सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड,उपाध्यक्ष मच्छिंद्र कांबळे,सचिव शुभम चव्हाण,गणेश भुई,सलीम पटेल, सुरेश कांबळे,मियाखान मोकाशी, बाळासो कांबळे,बाबाशा मकानदार, यांच्यासह तालुक्यातील पूरग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.