मौनी महाराजांची आध्यात्मिक उर्जा शिक्षण आणि सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी : आ. सतेज पाटील

कोल्हापूर : मौनी महाराजांच्या अध्यात्मिक परंपरेचा उजाळा देणारी ज्ञानज्योत आज पाटगावमध्ये प्रज्वलित करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मौनी विद्यापीठाचा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या परंपरेची सुरवात करण्यात आली. गेली अनेक वर्षे या ज्ञानज्योत प्रज्वलित करण्याच्या पाटगावात प्रज्वलित होणारी ज्योत केवळ एक धार्मिक परंपरा नसून, ज्ञानप्रसाराचा वारसा पुढे नेण्याचे प्रतीक आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची आणि अध्यात्माची गंगा पोहोचवण्याचा संकल्प या मौनी महाराजांच्या ज्ञानज्योतीतून प्रकट होतो.

 

 

 

 

आमदार सतेज पाटील म्हणाले, गारगोटी परिसरात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, हे मौनी महारांच्या शिकवणीचे आधुनिक स्वरूप आहे. संपुर्ण डी. वाय. पाटील परिवारासह आम्हा सर्वांना या कार्यात हातभार लावण्याची संधी मिळणे हे आमचे सद्भाग्य आहे.

मौनी महाराजांचा इतिहास त्यांच्या समाधीपुरताच मर्यादित नसून तो एक प्रेरणादायी प्रवास आहे. मुळचे उत्तूरचे आणि पाटगावामध्ये स्थायिक झालेले मौनी महाराज यांनी आपल्या मौनातून आध्यात्मिक कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण स्वारी वेळी त्यांना आशिर्वाद दिल्याच्या नोंदी सापडतात. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज व शाहू महाराज यांच्यासारख्या महापुरुषांनीही त्यांच्या कार्याची महती ओळखून आणि त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे.

या सोहळ्याला संजय बेनाडीकर सरकार, दिलीप बेनाडीकर सरकार, महेंद्र बेनाडीकर सरकार, मधुकर देसाई, डॉ. पी.बी. पाटील, अरविंद चौगले, नंदकुमार ढेंगे, श्यामराव देसाई, अरविंद चौगुले, बाजीराव चव्हाण, संदीप नरके, प्रा.अर्जुन आबिटकर, राहुल देसाई, नंदकुमार ढेंगे, आर. के. मोरे, सचिन घोरपडे, विश्वजीत जाधव, राजू काझी, बाळासो गुरव, प्रा. उदय शिंदे सरपंच अनिल सावंत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.