डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे ‘ बायोमेक’ आंतरराष्ट्रीय परिषदेत यश

कोल्हापूर : कृष्णा विश्व विद्यालय, कराड येथे झालेल्या “बायोमेक इन इंडिया – २” या आंतरराष्ट्रीय परिषदेत डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसीप्लीनरी रिसर्चच्या पीएचडी विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. यावेळी पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये सोहेल बाबूलाल शेख यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

 

 

या परिषदेमध्ये ३७ संस्था आणि ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विविध विषयावर स्पर्धा, सादरीकरण व संबंधित विषयांवर शास्त्रज्ञांच्या सत्रांचे आयोजन करण्यात आले.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सोहेल बाबूलाल शेख यांनी ‘युज ऑफ ए.आय. अँड रोबोटिक्स इन लाइफ सायन्स’ या पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर प्रणोती अनिल कांबळे यांनी मॉडेल स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. सुस्मिता सतीश पाटील यांनी ‘युज ऑफ ए.आय. अँड रोबोटिक्स इन लाइफ सायन्स’ आणि राधिका बाबासाहेब जाधव यांनी ‘ईन्टरप्रिनरशिप इन लाइफ सायन्स’ विषयावरील पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला आहे.

सर्व विद्यार्थी हे मेडिकल बायोटेकनोलोंगी व स्टेम सेल आणि रिजनरेटिव मेडिसीन विभागाच्या प्राध्यापिका डॉ. अर्पिता पांडे-तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत आहेत. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, विभाग प्रमुख डॉ. मेघनाद जोशी, रिसर्च गाईड डॉ. अर्पिता पांडे-तिवारी यांनी अभिनंदन केले आहे.