इचलकरंजी – इचलकरंजी शहरात एका पतीने पत्नीची निर्घुण हत्या केली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही सर्व घटना स्वामी मळा परिसरात घडली आहे. दीपक धावत्रे असे त्या पतीचे नाव आहे.
दिपकने आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिच्यावर धारदार शस्त्राने मानेवर आणि तोंडावर वार केला आहे. या निर्घुण हत्येनंतर दीपक स्वतःहून शिवाजीनगर पोलिसात हजर झाला आहे. दीपक विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.