कोल्हापूर :
10 हजार हेक्टर जमीन क्षारमुक्त करण्याचा संकल्प उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी करून प्रत्यक्षात साडेतीन हजार एकरावर काम झाल्याने शेतकरी पूर्वीपेक्षा दुपटीने जास्त उत्पादन घेत आहेत. लोकसहभागातून, लोकांनी एकत्र येऊन, क्षारपडमुक्तीचे एक चांगले काम सुरू आहे. छोट्या गोष्टींसाठी लोक एकत्र येणे अवघड असते, पण या क्षारपडमुक्तीच्या कामासाठी शेतकरी एकत्र आले आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे. क्षारपडमुक्तीच्या या कामासाठी शासकीय अधिकाऱ्याकडून शासनाचे सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
कवठेगुलंद येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था मर्यादित कवठेगुलंद, शेडशाळ या संस्थेच्या वतीने 250 एकरावर मुख्य पाईपलाईन टाकण्यासाठी खुदाई कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रांताधिकारी मोसमी चौगुले बेर्डे, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, श्री दत्तचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे पुढे म्हणाले, क्षारपड मुक्तीच्या या कामाला काही ठिकाणी शासनाच्या निधीची जोड मिळाली आहे. यासाठी गणपतराव पाटील यांचे प्रयत्न मोठे आहेत. शेतकऱ्यांनी पुढच्या फायद्याचा विचार करून या प्रकल्पात सहभाग घेतला आहे. शास्त्रीय दृष्ट्या आपल्या जमिनीत काय कमी आहे आणि उत्पन्न वाढीसाठी काय करता येईल याचा अभ्यास करून हा प्रकल्प राबवून यशस्वी केला आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चांगली दूरदृष्टी दाखविली आहे. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी शासनाचे सर्व प्रकारचे सहकार्य राहील.
शेतकऱ्यांनीही अशाच पद्धतीचे चांगले प्रकल्प हातामध्ये घेऊन उत्पन्न वाढवावे, कारण ग्रामीण भागातील उत्पन्न वाढले की अर्थव्यवस्थेला भर मिळते, यातून देशाची अर्थव्यवस्था वाढून लोकांचाही विकास होणार आहे. यासाठी अशा प्रकल्पांच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा आहेत.
गणपतराव पाटील यांनी दत्त कारखान्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध ऊस विकास योजनांची माहिती देऊन क्षारपड मुक्तीचा प्रकल्प कशा पद्धतीने यशस्वी होत आहे. याचा संपूर्ण आढावा घेतला.
मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनीही लॅपटॉप वर क्षारपड मुक्तीचे काम कसे चालते याची सविस्तर माहिती दिली.
कवठेगुलंदच्या सरपंच सौ. संगीता शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. अविनाश कदम यांनी आभार मानले.
प्रारंभी स्व. डॉ. सा.रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक दरगू गावडे, विश्वनाथ माने, भैय्यासाहेब पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, मंडल अधिकारी अमितकुमार पाडळकर, गट विकास अधिकारी नारायण घोलप, माती परीक्षक ए. एस. पाटील, कॉन्ट्रॅक्टर कीर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे, गजानन चौगुले, ऋषिराज शिंदे, धनाजी पाटील नरदेकर, शेडशाळचे सरपंच हैदरअली पाथरवट, सुधीर पाटील, राम तांबिरे, श्रीपाल कागले, शंकर पाटील, मोहन पाटील, प्रमोद शेकदार, बाळासो पाटील, रावसो पाटील, नितीन मानकापुरे, राजगोंडा पाटील, रमेश जगताप, संजय पाटील, सुरेश जगताप, रणजीतसिंह शिंदे, सुरेश कांबळे, एन. डी. पाटील, तलाठी सदाशिव निकम, ग्रामसेवक जमादार, रावसाहेब चौगुले, दादा देवताळे, आप्पासो मडिवाळ, शिवमूर्ती देशिंगे, अशोक पाटील, अशोक कदम, संघाप्पा केटकाळे यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शेडशाळ येथील महिलांनी सुरू केलेल्या देशी वाण बीज बँकेस भेट देऊन महिलांच्या उपक्रमाचे कौतुक करून सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची हमी दिली. बीज बँकेच्या महिलांनी सर्व मान्यवरांचा सत्कार करून बीज बँकेबद्दल विस्तृत माहिती दिली.