कोल्हापूर –
गगनबावडा राज्य महामार्गाचे रस्ता रुंदीकरण काम सुरु आहे. या मार्गावरील बालिंगा. ता. करवीर. येथील मेनरोडवर असणारी विधुत वाहिनीची डी. पी.( ट्रान्सफार्म) रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्याच्या मद्यभागी आला आहे. ही स्थलांतरीत करावी यासाठी व्यवसाय धारक,ग्रामस्थ व प्रवाशी यांच्या वतीने वीज वितरण कंपनी कार्यकारी अभियंता कोल्हापूर येथे करवीर युवा सेना अध्यक्ष अजय वाडकर.ग्रांपं सदस्य धनंजय ढेंगे प्रशांत आयरेकर सरदार माळी सर्जेराव वाडकर सौरभ वाडकर सौरभ सातपुते धनंजय आयरेकर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या राज्य महामार्गाचा वापर गोवा, मालवण सह तळ कोकणात जाण्यासाठी जवळचा मार्ग केला जातो. हजारो अवजड वाहने दिवस रात्र या रोडवरून प्रवास करीत असतात.हा ट्रान्सफार्म बऱ्याच वर्षांपूर्वी बसवला असल्याने तो कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुंदीकरणात हा ट्रान्सफार्म रस्त्याच्या मध्ये आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. याचं डी. पी. शेजारी प्रवाशी बाहेर गावी जाण्यासाठी उभी असतात.या डी. पी. शेजारी हॉटेल व इतर व्यवसाय करणारे नागरिक यांना ही डी. पी. मोठी अडथळा ठरत आहे. ती बाजूला करावी. अशी मागणी व्यवसाय धारकांसह प्रवाशी वर्गातून होतं आहे.
याबाबत संबंधित खात्याने याची नोंद घेऊन तात्काळ उपाय योजना करावी अशी मागणी व्यवसाय धारक व प्रवाशी यांच्या वतीने करवीर युवा सेना अध्यक्ष अजय मारुती वाडकर. यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यकारी अभियंता.कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर ग्रां पं सदस्य धनंजय सदस्य प्रशांत आयरेकर सरदार माळी सर्जेराव वाडकर सौरभ वाडकर सौरभ सातपुते धनंजय आयरेकर यांच्या सह्या आहेत. याबाबत युवा सेना अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला असता ही धोकादायक डी. पी. हटवण्यासाठी करवीरचे आमदार चंद्रदीप नरके. यांच्या सहकार्यातून व मार्गदर्शनाखाली सदरची डी. पी.( ट्रान्सफार्म ) स्थलांतरीत जो पर्यंत होतं नाही. तो पर्यंत सातत्याने पाठपुरावा करणार असे अजय वाडकर. यांनी सांगितले.