कुंभोज (विनोद शिंगे)
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करणारा ‘शेतीप्रगती २०’ वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ‘शेतीप्रगती कृषीभूषण पुरस्कार’ वितरण व पुस्तक प्रकाशन समारंभ संपन्न झाला.शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे या कार्यक्रमाला कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, मान्यवर, प्रगतिशील शेतकरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे आयोजन तेजस प्रकाशन, ध्यास शेती ट्रस्ट, अहिल्या कृषी, गोकुळ आणि बाहुबली ट्रेडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या वेळी अजित शिरगावकर थेरगाव (ता.शाहुवाडी) यांना इंद्रजित देशमुख साहेब काकाजी यांच्या हस्ते ‘शेतीप्रगती जीवनगौरव व कृषीभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच तेजस प्रकाशन तर्फे नवे कृषीविषयक पुस्तक प्रकाशित करण्यात आले.पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवांचे आणि आधुनिक शेती पद्धतींचे मार्गदर्शन केले. तसेच, उपस्थित मान्यवरांनी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि उत्पादनवाढीच्या संधींवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तेजस प्रकाशन आणि सहप्रायोजक संस्थांचे विशेष सहकार्य लाभले. या सोहळ्यामुळे कृषीविषयक नव्या संकल्पनांना चालना मिळाली असून, प्रगतिशील शेतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
यावेळी इंद्रजीत देशमुख (काकाजी) प्रमुख, शिवम प्रतिष्ठान,घारेवाडी, अरुणराव डोंगळे चेअरमन गोकुळ कोल्हापूर.मा.आमदार अशोकराव माने (बापू).विकास पाटील माजी कृषी संचालक, महाराष्ट्र शासन, पुणे.
उमेश पाटील विभागीय कृषी सह. संचालक कोल्हापूर,योगेश वेंगुर्लेकर वरिष्ठ विपणन प्रबंधक, आरसीएफ लि,कोल्हापूर.रावसाहेब पुजारी कोल्हापूर,डॉ.वसंतराव जुगळे प्राचार्य योजना जुगळे,प्रताप चिपळूणकर कोल्हापूर
डॉ.आप्पासाहेब पुजारी मंगळवेढा.उपस्थित होते.