शरद कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे वितरण

कुंभोज प्रतिनिधी ( विनोद शिंगे)
जयसिंगपूर येथे आयोजित राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनात तहसील कार्यालयाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलमध्ये शेतकऱ्यांना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार अशोकरावजी माने यांच्या हस्ते फार्मर आयडी वितरित करण्यात आले.या आयडीचे वाटप माझ्या आणि हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

 

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या ओळखपत्राच्या वितरणामुळे त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ सहज मिळू शकणार आहे.या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना अधिकृत ओळख प्राप्त होऊन अनुदान, कर्जसुविधा आणि कृषी योजनेतील लाभ सहज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याप्रसंगी तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्यासह अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच त्याचा उपयोग कसा करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

शरद कृषी प्रदर्शनात विविध प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यामध्ये हवामान आधारित शेती, तंत्रज्ञान वापरून उत्पादनवाढ,बियाणे आणि खतांच्या सुधारित जाती यांचा समावेश होता. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.

फार्मर आयडीच्या वाटपामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार असून,हा उपक्रम शासनाच्या डिजिटल भारत मोहिमेला चालना देणारा ठरत आहे.