कोल्हापूर : कोल्हापूर चर्च कौन्सिल या संस्थेला 100 वर्ष पुर्ण झाली. संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वायल्डर मेमोरियल चर्च, कोल्हापूर येथे पार पडला. या ऐतिहासिक दिवसा निमित्त कौन्सिलच्या सर्व सदस्यांना आणि ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या.

संस्थेच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित रहाता आल्याने मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. बीज चांगल असेल तर झाड चांगलं होत, हा पाया निश्चितच चांगला आहे. मानवतेचा, चांगल्या विचारांचा, सर्वांना बरोबर घेवून जाणारा आणि सर्वांना मदत करणारा आहे. म्हणूनच शतकोत्तर वर्षे ही संस्था टिकून आहे. या संस्थेच्या माध्यमातून चांगल्या विचारांचा लाभ हजारों लोकांना मिळाला. त्यामुळे आयुष्यात काहीतरी बदल घडवणारा चांगला संदेश या सोहळ्यातून घेऊन जाऊया अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी कोल्हापूर चर्च कौन्सिलचे सचिव रेव्ह. राजीव एंगड, रेव्ह. डी.बी. समुद्रे, ब्रदर सरोज अपट, दिनानाथ कदम, उदय विजापूरकर, आनंद म्हाळुंगेकर यांच्यासह अनेक मान्य़वर आणि ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
