मुरगूडमध्ये होणार निमंत्रितांच्या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा समरजितसिंह घाटगेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

मुरगूड,प्रतिनिधी

येथे निमंत्रितांच्या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक एक फेब्रुवारी व रविवार दिनांक दोन फेब्रुवारी अशा दोन दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मुरगुड विद्यालयाच्या पटांगणात या स्पर्धा होतील. राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन स्पर्धेचे संयोजक आहेत.

 

 

 

शनिवारी तारीख १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी शाहू साखर कारखान्याचे संचालक डाॕ. डी एस पाटील असतील.यावेळी बिद्रीचे माजी उपाध्यक्ष दत्तामामा खराडे, बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील, युवा नेते पद्मसिंह पाटील, जय पाटील, शाहू कृषीचे चेअरमन अनंत फर्नांडिस यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहील.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांच्या शुभहस्ते होईल. अध्यक्षस्थानी गोकुळची माजी संचालक रणजीतसिंह पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील, युथ बँकेचे संचालक विश्वजितसिंह पाटील,तालुकाध्यक्ष शिवानंद माळी,अरुण व्हरांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती राहील.

अमर चौगले ,सुशांत मांगोरे,विजय गोधडे,सुरेश गोधडे,राहूल खराडे,विशाल भोपळे आदी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजन करीत आहेत.