कोल्हापूर : इस्लामपूरचा तरूण व्यावसायिक निलेश देशमुख याने कसबा बावडा येथे सुरु केलेल्या ‘सह्याद्री मसाले’ या व्यवसायाचे उद्धाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. नविन व्यवसायासाठी देशमुख कुटुंबाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचडे, श्रीराम सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष पाटील आणि सर्व संचालक यांच्यासह प्रशांत पाटील, शहाजी पाटील, बाजीराव पाटील, रविंद्र रेडेकर, धनराज पाटील आदी उपस्थित होते.