कुंभोज (विनोद शिंगे)
धरणग्रस्त दुर्गेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मारुती पाटील यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षस्थानी सरपंच सुलभा कदम होत्या. एकूण सात जणांचे अर्ज आले होते. सहाजणांनी अर्ज मागे घेतल्याने पाटील यांची निवड झाली. यावेळी उपसरपंच सुनील पाटील, ग्रा.पं. सदस्य सादिक वारुणकर, सचिन घोलप, शोभा घोलप, सुनीता पाटील, संगीता पाटील, ग्रामसेवक एम. एच. मुल्ला उपस्थित होते.