कोल्हापूर : लाईन बाजार कसबा बावडा येथे सेवा रुग्णालय सुरू आहे. या रुग्णालयामधील उपचार चांगले असल्याने येथील रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे सदर रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणे आवश्यक आहे. श्रेणी वर्धन झाल्यास रुग्णांची या ठिकाणी सोय होऊ शकते. सेवा रुग्णालयच्या आहे त्याच इमारतीमध्ये 50 खाटावरून 100 खाटा मध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई येथे दिनांक 3 /6/ 2022 रोजी प्रस्ताव पाठवलेला आहे.
हा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे ,त्यावर निर्णय व परिपत्रक जारी होणे आवश्यक आहे तरी सदर पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येत आहे की आपण यामध्ये लक्ष घालून पाठपुरावा करून लवकरात लवकर सेवा रुग्णालयाचे 50 खाटा वरून 100 खाटा मध्ये श्रेणीवर्धन करावे अशी मागणी आम आदमी पार्टीने आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक दिलीप माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
2013 मध्ये मंजूर झालेल्या महिला व नवजात शिशु रुग्णालय मंजूर झाले आहे. जागे अभावी प्रलंबित असलेले महिला व नवजात शिशु रुग्णालय हे सेवा रुग्णालयाच्या रिकाम्या जागेत बांधकाम करावे अशी मागणी केली. तसेच औषध भांडारासाठी उभारलेली इमारत आजपर्यंत वापरात आलेली नाही. निकृष्ट बांधकाम केल्याने या इमारतीला गळती लागलेली आहे. इमारत दुरुस्त करून त्वरित वापरात आणावी अशी मागणी आप शिष्टमंडळाने केली.
श्रेणीवर्धन करण्यासाठी योग्य पत्रव्यव्हार करू, महिला व नवजात शिशु रुग्णालयाच्या जागेवर बांधकाम करण्यासाठी आर्किटेक्टची बैठक घेऊ, औषध भांडारच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागास काम करण्याची सूचना देण्यात येणार असल्याचे उपसंचालक माने यांनी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, समीर लतीफ, विजय हेगडे, रमेश कोळी आदी उपस्थित होते.