मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची साप्ताहिक बैठक मुंबईतील देवगिरी येथे पार पडली. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुलजी पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनीलजी तटकरे यांनी उपस्थित आमदारांशी संवाद साधून त्यांच्या मतदारसंघातील विविध प्रश्न, समस्या आणि पक्षाच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी प्रत्येक मतदारसंघात सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यक्षम तयारी करण्याचे आणि पक्ष अधिकाधिक बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीला पक्षाचे आमदार, ज्येष्ठ नेते, मंत्रीमहोदय आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.