‘गोकुळ’मार्फत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्या (गोकुळ) वतीने आदर्श दूध उत्पादक म्हणून सुशांत गणपती पार्टे व राणी सुशांत पार्टे रा. एैनी पैकी करंजवाडी, ता. राधानगरी यांचा तसेच गोकुळ दूध संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांची गोकुळ दूध संघ कर्मचारी पतसंस्थेच्या नूतन चेअरमनपदी व व्हाइस चेअरमनपदी पांडुरंग कापसे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच संघ सेवेतून सेवानिवृत्‍त झालेले धनंजय यादव (मरळी), चंद्रकांत चौगुले (नूल), संतराम कळेकर (गिजवणे), संजय शिंदे (गारगोटी) यांचा गोकुळ परिवारच्यावतीने सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे सर्व संचालक मंडळाच्या हस्‍ते गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे संचालक मंडळाच्या मिटिंग मध्ये करण्‍यात आला.

 

 

 

  याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच पार्टे कुटुंबातील सदस्य, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

🤙 9921334545