आ. अमल महाडिक यांनी महाराणी ताराराणींच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन दिले निवेदन

कोल्हापूर : करवीर राज्य संस्थापिका रणरागिणी भद्रकाली महाराणी ताराराणी यांची समाधी सातारा जिल्ह्यातील कृष्णा-वेण्णा नदीच्या संगमस्थानी संगम माहुली येथे आहे. ही समाधी दुर्लक्षित अवस्थेत असून जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे. या संदर्भात आमदार अमल महाडिक यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले.

 

 

राजघराण्यातील सन्माननीय सदस्य आणि मंत्री म्हणून महाराणी ताराराणींच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती त्यांना केली.
निधी देण्यासंदर्भात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास कोल्हापुरातील विविध सामाजिक संस्था आणि महाराणी ताराराणी यांच्या बद्दल आदरभाव असणारे सर्वसामान्य कोल्हापूरकर लोकवर्गणीतून या समाधीची दुरुस्ती करतील. संबंधित जागेच्या मालकी संदर्भात माहिती घेऊन किमान ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासंदर्भात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना विनंती केली.