कुंभोज (विनोद शिंगे)
मिणचे (ता.हातकणंगले) येथील ग्रामपंचायत सरपंच पदी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव युवाशक्ती विकास आघाडी व माजी आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर गटाच्या सविता यशवंत वाकसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मिणचे ही एकूण 13 सदस्य ग्रामपंचायत असून यादव गटाचे नऊ सदस्य आहेत. त्यापैकी चार वषे यादव गटाच्या रंजना जाधव यांचा सरपंच कार्यकाल उल्लेखनीय राहिला त्यांच्या कार्यकालमध्ये त्यांनी अनेक विकास कामे केली .शेवटच्या टप्प्यात पार्टी नियमाप्रमाणे सविता वाकसे यांना सरपंच पदाची संधी देण्याच्या ठरले होते त्या पद्धतीने सरपंच रंजना जाधव यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा हातकणंगले गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला होता तो राजीनामा मंजूर झाल्यानंतर नूतन सरपंच निवडीसाठी आज झालेल्या बैठकीत सरपंच पदासाठी प्रवीण यादव गटाच्या सविता वाकसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग धुमाळ यांनी केली.
सदर निवडणुकीचे कामकाज ग्रामपंचायत अधिकारी सुभाष पाटील यांनी पाहिले यावेळी उपसरपंच नीलम घाटगे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. नूतन सरपंच सविता वाकसे यांचा सत्कार मावळत्या सरपंच रंजना जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी यादव गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आताशबाजी व गुलालाची उधळण करून आपला आनंद व्यक्त केला. नूतन सरपंच सविता वाकसे यांना माजी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव व माजी आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर ,सव गटनेते यांनी शुभेच्छा दिल्या.