कोल्हापूर :दिनांक 27/01/2025 रोजी सकाळी 09.30 ते दुपारी 15.00 वा. दरम्यान *”रस्ता सुरक्षा अभियान-2025″ च्या अनुषंगानेमहामार्ग पोलीस उजळाईवाडी व महालक्ष्मी ब्लड बँक कागल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदरचे रक्तदान शिबिर स्वामी समर्थ मंगल कार्यालय उजळाईवाडी कोल्हापूर येथे पार पडले.
सदर रक्तदान शिबिरास 220 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून प्रत्येक रक्तदात्यास मोफत हेल्मेट देण्यात आले आहे.तसेच सर्वांचे मोफत आरोग्य तपासणी, रक्त तपासणी व डोळे तपासणी करण्यात आली आहे. सदर शिबिरास म.पो. केंद्र उजळाईवाडीकडील PSI सुनिल माळगे, प्रदीप जाधव व सर्व स्टाफ असे उपस्थित राहून सर्व उपस्थितांना वाहन चालवताना घ्यावयाची दक्षता व वाहतूक नियमाबाबत प्रबोधन तसेच हेल्मेट वापरणे बाबत जनजागृती करण्यात आले आहे.