कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने संविधान गौरव अभियान संपन्न झाले. याप्रसंगी राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील व विधानपरिषद आमदार मा. अमित गोरखे यांच्या समवेत उपस्थित राहिलो.
अभियानाच्या सुरुवातीस भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान ग्रंथ व भारतमातेचे पूजन करून संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन केले.
भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास, ब्रिटिश सरकारचा कायदा व भारतीय संविधानाची निर्मिती, घटना समिती याबाबत अनेक पैलू उलघडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधानाबाबतचे योगदान याविषयी उपस्थितांना राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादां पाटील यांनी मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान करण्यासाठी इंग्लंड मधील स्मारक, संविधान दिन ते इंदूमिल मधील स्मारक इत्यादी गोष्टींचा उल्लेख करत बाबासाहेबांच्या जीवन चरित्रावर आधारित मा. मोदी सरकार व मा. फडणवीस सरकार करत असलेल्या कार्याचा गौरव केला व पुढील काळात देखील बाबासाहेबांचे विचार व कार्य सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे.
तसेच विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांनी काँग्रेस सरकारच्या काळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर झालेला अन्याय व संविधान समितीमध्ये बाबासाहेब यांची निवड होऊ नये यासाठी काँग्रेसने केलेले प्रयत्न याविषयी परखड मत मांडले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल आवाडे, नाथाजी पाटील, विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, रूपाराणी निकम यांच्यासह भाजपा पदाधिकारी व संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.